PHOTO : जीर्णोद्धारानंतर असा दिसतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वाडा!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगावमधील खंडोजी नेवसे यांच्या वाड्यात 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधल्या काळात या वाड्याचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. पण आता पुरातत्व विभागाकडून हा वाडा अठराव्या शतकात जसा होता तसाच उभारण्यात आला आहे.
खंडोजी नेवसे यांच्याकडे नायगावची पाटीलकी होती. त्या पाटीलकीला साजेसा हा वाडा आहे.
दोन्ही बाजूला दोन माजघरं आणि ही माळी...इथे सावित्रीबाईंचा जन्म झाला.
जाड दगड मातीच्या भिंती आणि त्यातून डोकावणारी सूर्यकिरणे
या वाड्यातील हे स्वयंपाकघर
धान्य साठवण्याचे हे भांडारघर दोन टप्प्यात आहे. यामध्ये वर धान्य साठवण्याच्या कनग्या आहे तर खाली जाते आहे
तर जमिनीखाली 12 फूट खोल धान्य साठवण्याचा पेव असून त्यावर लटकवलेला कंदील आहे.कंदिलाची ज्योत तेवत राहिली तर आतमध्ये माणूस उतरण्यास धोका नाही असं मानलं जातं आणि कंदीप विझला तर आतमधअये विषारी वायू आहे हे ओळखलं जायचं
सावित्रीबाईंचे हे जन्मस्थान स्फूर्तीस्थान तर आहेच पण त्याचबरोबर अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील वास्तुकलेचा उत्तम नमुना देखील आहे.
नायगावचा हा वाडा जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सुंदर देखील आहे.