diabetes : मधूमेहाच्या रुग्णांनी तूरडाळ का खावी? जाणून घ्या याचे फायदे
मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तूरीच्या डाळीमध्ये जे घटक असतात त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
तसेच ते प्रमाण नियंत्रणामध्ये राहण्यास देखील मदत होऊ शकते.
मधुमेहाच्या रुग्णांना तूरडाळ खाण्याचा सल्ला देखील डॉक्टर देत असतात.
त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक असतात जे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरु शकतात.
मधुमेही रुग्णांना वारंवार भूक लागते. अशा परिस्थितीत तूरडाळ हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
तूरडाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे लवकर भूक लागत नाही.
तूरीच्या डाळीत असलेले मॅग्नेशियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
तूरीच्या डाळीमध्ये कार्बोहायड्रेट्स देखील असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
तूरीची डाळीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.