Health Tips : सफरचंद आरोग्यासाठी वरदान; जाणून घ्या ते खाण्याची योग्य वेळ कोणती?
सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा लोक सफरचंद खाण्याची योग्य वेळ याबद्दल संभ्रमात असतात.अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या वेळी सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होतो.
सफरचंदमध्ये नैसर्गिक साखर आणि फ्रक्टोज आढळतात, त्यामुळे ते सकाळी रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर आहे
सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सफरचंदात असलेल्या फायबरमुळे पचनक्रियाही चांगली राहते, त्यामुळे सकाळी सफरचंद खाल्ल्यास बद्धकोष्ठतासारख्या समस्या टाळता येतात.
सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो.
सफरचंद रात्री कधीही खाऊ नये. यामध्ये साखर आणि फ्रक्टोज आढळतात, ज्यामुळे आपल्याला सक्रिय वाटते, परंतु रात्री ते खाल्ल्याने झोप येण्यास त्रास होतो.
सफरचंद जेवणाबरोबरही खाऊ नये. दोन्ही एकत्र पचणे कठीण होऊ शकते.
सफरचंद संध्याकाळी देखील खाऊ नये. त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.