Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Health Tips : रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे 'ही' साधी गोष्ट करा; मग पाहा फायदे
रोज रात्री झोपण्यापूर्वी ही साधी गोष्ट 5 मिनिटे करा, यामुळे तुमचे वजन कधीच वाढणार नाही पण अनेक फायदे होतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंगणकासमोर जास्त वेळ बसणे, फास्ट फूड खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी सवयींमुळे वजन वाढणे, पोटाचा त्रास, अॅसिडिटी, गॅस आदी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
टाळण्याचा एक चांगला उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी काही योगासने करणे. झोपण्यापूर्वी हा सोपा योग केल्याने या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
सुखासन: हे आसन करण्यासाठी, पाय रोवून बसा आणि तुमचे तळवे गुडघ्यावर वर ठेवा. तुमची पाठ सरळ करून बसा. काही वेळ या आसनात राहा. नंतर आरामशीर स्थितीत या. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि शरीराला आराम मिळतो. वजनही कमी होते.
बालासन: बालासन हे योगाचे एक महत्त्वाचे आसन आहे जे शरीराला विश्रांती देण्यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो आणि शांत झोप लागते. याला 'चाइल्ड्स पोज' म्हणतात. सर्वात आधी, पायाची बोटे एकमेकांना स्पर्श करून पुढे वाकणे. हात पुढे वाकवून गुडघे एकत्र आणून हे आसन करा.
वज्रासन : हे आसन करण्यासाठी गुडघे खाली करा. टाच एकमेकांच्या जवळ ठेवा. पायाची बोटे एकमेकांच्या वर ठेवण्याऐवजी उजव्या आणि डाव्या बाजूला एकमेकांच्या पुढे ठेवा. तळवे गुडघ्यांवर वरच्या बाजूला ठेवा. तुमची पाठ सरळ करा आणि पुढे पाहा. पाठ, कंबर आणि गुडघे लवचिक बनवण्यासाठी हे खूप चांगले आहे. रात्रीच्या जेवणानंतर लगेचच तुम्ही हे सहज करू शकता.
ध्यान: आरामदायी सुखासनात बसा. खांदे मोकळे ठेवा आणि शरीराला आराम द्या.आता 5 सेकंद पुढे पाहा. नंतर 5 सेकंद मागे वळून पाहा. तसेच, उजव्या आणि डाव्या बाजूकडे 5-5 सेकंद पाहा. आता डोळे बंद करा. जितके शक्य असेल तितके, तुम्ही नुकत्याच पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे एक साधं आसन आहे जे तुम्हाला शांत आणि आरामदायी अनुभव देऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.