सोलापूर बाजार समितीत 1500 गाड्यांची आवक
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion Farmers) अडचणीत सापडले आहेत. कारण, कांद्याच्या दरात (Onion Price) सातत्यानं घसरण होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकरनं कांद्याच्या निर्यातीवर बंद (Onion Export Ban) घातल्यानंतर कांद्याचे दर घसरले आहेत.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee of Solapur) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे.
बाजार समितीत सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवक झाली आहे.या वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवाक झाली आहे. अद्यापही अनेक गाड्या रांगेत थांबून आहेत. त्यामुळं आज सकाळी दहा वाजता सुरु होणारे कांद्याचे लिलाव दुपारी दोन वाजता करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे. तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं सलग दोन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे.
निर्यातबंदीमुळं सोलापूरच्या बाजारात कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरले होते. त्यातच वाढलेल्या आवकेमुळं दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
, सोलापूर बाजार समितीच्या नियोजनाच्या अभावामुळं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातेय.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कमी भाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळला.