Sweet Corn : मधूमेहाच्या रुग्णांनी कणीस खावे का? जाणून घ्या यावर तज्ज्ञांचं मत
लिंबाचा रस आणि मसाल्यांच्या मदतीने मका हा स्वादिष्ट बनवला जातो, जे लोक मोठ्या चवीने खातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर मक्याच्या दाण्यांमुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नाही.
पण मधुमेहाच्या रुग्णांनी कणीस खावे की नाही हा प्रश्न त्यांना नक्कीच पडू शकतो.
काही लोकांना असं वाटतं की कणीस खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. तर काही जण मधुमेहाच्या रुग्णांसाठी कणीस फायदेशीर असल्याचं सांगतात.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उकडलेल्या कॉर्नचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) 52 आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उकडलेल्या कॉर्नचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) 52 आहे.
कार्बोहायड्रेट्स देखील कॉर्नमध्ये आढळतात, ज्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
तज्ञांच्या मते, सुमारे 10 ग्रॅम पर्यंत कॉर्न खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही.
मात्र, जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमची साखरेची पातळी वाढण्याची शक्यता आहे.
कणीस हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत मानला जातो, जो रक्तप्रवाहात कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतो आणि इन्सुलिन नीट ठेवण्यास मदत करते.
त्यामुळे योग्य प्रमाणात याचे सेवन केले तर तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.