Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक, अटकेनंतर कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध
स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळ्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून त्यांना सीआयडीनं अटक केली आहे.
त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
नायडू यांच्यावर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना अटक करण्यात आली.
त्यांना अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा नांदयाल येथे हजर होता.
त्यांच्या अटकेवेळी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.
अनेकांनी त्यांच्या गाडीसमोर देखील येण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या अटकेचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील करण्यात आला होता.