In Pics : मीठाचं अतिसेवन टाळा, WHO चा इशारा

सोपं आणि चवीला रुचकर असे हे पदार्थ जीभेचे चोचले पुरवतात खरे, पण त्यामध्ये फॅट, ट्रान्स फॅट, साखर आणि मीठाचंही प्रमाण अमाप असतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनामुळे ताणतणाव, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका संभवतो. या साऱ्यामध्ये फळभाज्या आणि तंतूमय भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं, ज्याचा शरीराला मोठा फायदा असतो. बेकन, चीज, सलामी, वरुनही मीठ शिवरलेले पदार्थ (वेफर्स), इन्सटंट नूडल्स आणि इतही पदार्थ हे साठवणीचे असल्यामुळे त्यामध्ये मीठाचा वापर केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार प्रौढ वयोगटातील व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी (एका टीस्पूनपेक्षाही कमी) मीठाचं सेवन केलं पाहिजे.
15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं. (या वयोगटात 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपान घेणाऱ्या बालकांचा समावेश नाही).
सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात
यामुळं WHO नं रोजच्या जेवणाची तयारी करताना त्यामध्ये मीठ घालणं टाळा, जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका, मीठाचा जास्त वापर असणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळा, सोडियमचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या असा सल्ला दिला आहे.