केस धुण्यासाठी कोणतं पाणी योग्य? थंड की गरम

हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड आणि कोरड्या हवेमुळे केस कोरडे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तसेच हिवाळ्यामध्ये केस जास्त प्रमाणात गळण्याची शक्यता असते.

हिवाळा ऋतू येताच आपण सर्वजण आपले उबदार कपडे आणि रेशमी ब्लँकेट बाहेर काढतो. आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो.
त्यासोबतच लोकं हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करतात.सर्दीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुणे आवडते,पण ते केसांसाठी हानिकारक ठरु शकते.
खूप गरम पाण्यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस आणखी कोरडे होण्याची शक्यता असते.
याशिवाय, हे केसांचे नैसर्गिक तेल देखील नष्ट करते जे केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
त्यामुळे गरम पाण्याने केस धुतल्यास केस अधिक कोरडे होण्याची शक्यता असते.
गरम पाण्याने केस सतत धुतल्याने टाळू कोरडी होते, ज्यामुळे खाज आणि कोंडा होण्याची समस्या वाढते.
त्याचप्रमाणे गरम पाण्यामुळे केसगळतीची देखील समस्या निर्माण होते.