टॉयलेट पेपरचा सतत वापर करताय? कॅन्सरचाही धोका होऊ शकतो
ऑफिस,ट्रेन, अथवा हॉटेलमध्ये, वॉशरूममध्ये वैयक्तिक वापरासाठी टॉयलेट पेपरचा वापर केला जातो. परंतु टॉयलेट पेपर वापरण्याचा योग्य मार्ग कोणता ? हे तुम्हाला माहिती आहे का? टॉयलेट पेपरमुळे संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटॉयलेट पेपरमुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण खरेय. एवढेच नाही तर त्याचा तुम्हाला गंभीर त्रास होऊ शकतो. हा संसर्ग मांडीच्या आसपासच्या भागात होऊ शकतो.
टॉयलेट पेपरच्या अतिवापरामुळे शरीराच्या अंतर्गत भागात खाज येऊ शकते. इतकेच नाही तर प्रायव्हेट भागात लालसरपणा आणि खाजही सुटू शकते. कारण या सर्व प्रोडक्टवर प्रिजर्वटिव करुन परफ्यूम जोडला जातो.
स्मेलवाल्या टॉयलेट पेपरच्या अतिवापरामुळे प्रायव्हेट भागांमध्ये तीव्र खाज सुटणे आणि पुरळ उठू शकते. या प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल मिसळली जातात. ज्यामुळे खासगी भागांच्या पीएचवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
जेव्हा तुम्ही टॉयलेट पेपर वापरता तेव्हा तुम्ही ते घासू नका, कारण त्यामुळे त्या भागात खाज सुटते आणि काळेही पडू शकते.
टॉयलेट पेपरमधील फॉर्मल्डिहाइड (Formaldehyde) कार्बनिक आहे. त्यामुळे जळजळ होऊ शकते. याशिवाय कर्करोगाचा धोकाही असतो.