पायांना वांरवार सूज येतेय, मग अजिबात दुर्लक्ष करु नका, असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत
अशा स्थितीत पायांना येणाऱ्या सूजेकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपायांना सतत किंवा जास्त सूज येणे हे देखील काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
किडनी कमकुवत होणे, मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचेही लक्षण असू शकते.
त्यामुळे जर वांरवार तुमच्या पायाला सूज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करुन नये.
जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय किंवा शारीरिक समस्यांशिवाय तुमच्या पायांमध्ये सतत सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
पायात पाणी साचणे आणि पायात सूज येणे हे मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारख्या समस्यांचे लक्षण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णाच्या शरीरात इन्सुलिनची पातळी कमी असते.
नेक वेळा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय पाय सुजण्याची समस्या उद्भवते.
अशा स्थितीत ही सूज हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते.