वॉशरुम,टॉयलेट आणि बाथरुम यातंला नेमका फरक काय?
बाथरूम हा शब्द सर्वात सामान्य आहे. बाथरूममध्ये शॉवरपासून टॉयलेटपर्यंतच्या सुविधा आहेत. त्यात बादली, बाथटब, सिंक आणि टॉयलेट सीट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, बाथरूममध्ये टॉयलेट सीट असावीच असे नाही, काही लोक ते वेगळेही ठेवतात.
वॉशरूममध्ये सिंक आणि टॉयलेट सीट दोन्ही असतात. त्यात आरसाही लावता येतो.
पण इथे अंघोळ करायला आणि कपडे बदलायला जागा नसते. हे बहुतेक मॉल्स, चित्रपटगृह, कार्यालयांमध्ये असतात.
रेस्टरुममध्ये म्हणजेच विश्रांतीगृह. आता यातील विश्रांती हा शब्द ऐकून काहींना वाटेल की ही विश्रांतीची जागा आहे, परंतु त्याचा विश्रांतीशी काहीही संबंध नाही.
खरंतर हा एक अमेरिकन इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा अर्थ वॉशरूम असा होतो. अमेरिकेत वॉशरूमलाच विश्रामगृह म्हणतात. तर, ब्रिटिश इंग्रजीमध्ये याला वॉशरूम म्हणतात.
कुठेतरी टॉयलेट असं लिहिलं असेल, तर तिथे फक्त टॉयलेट सीट असेल, हँडवॉश आणि बदलण्याची सुविधा तिथे नसतात.
लॅवेटरी हा तितका वापरातला शब्द नाही. पण तरीही त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे. लॅटिनमध्ये लेव्हेटोरियम म्हणजे वॉश बेसिन किंवा वॉशरूम. म्हणजे हे सुद्धा एक वॉशरूम आहे.