Kolhapur News : कोल्हापूर बाजार समितीमधील विजयानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ अन् विरोधक काय म्हणाले?
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती देशातील एक नंबरची बाजार समिती बनवू, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजार समितीमधील विजयानंतर आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अर्जुन आबिटकर, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, मानसिंगराव गायकवाड यांच्यासह छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलच्यावतीने सर्व मतदारांचे आभार मानले.
गेल्या काही वर्षांतील बाजार समितीचा कारभार चांगला झाला नाही. त्यामुळे आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. आता पुन्हा आम्हाला संधी दिली आहे. त्यामुळे बाजार समिती शेतकऱ्यांना सर्व सोयी देऊ, असेही मुश्रीफ म्हणाले.
आमदार पी. एन. पाटील आणि विनय कोरे यांच्या मतदारसंघात जास्त मतदान असतानाही त्यांनी दोन-दोन जागांवर समाधान मानले. दोघांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणूनच ही आघाडी झाली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.
बाजार समितीत चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात नियोजन केले जाईल. नूतन संचालकही याकडे गांभीर्याने लक्ष देतील, असेही त्यांनी नमूद केले.
बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी आम्ही शिंदे गट म्हणूनच उतरलो असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.
बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पॅनेल रचनेला आणि प्रचाराला आणखी थोडा वेळ मिळाला असता, तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते, अशी प्रतिक्रिया विरोधी पॅनेलचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
या निवडणुकीत विरोधकांनी सुरुवातीपासूनच चुकीची भूमिका घेतली. २९२ मतदार चुकीच्या पद्धतीने मतदार यादीत घालण्याचा प्रकार केला. ते कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर यांनी दिली.
बाजार समितीत पक्ष नसतो. सर्वच लोकांचे समाधान होत नाही. जागा कमी आहेत आणि इच्छुक जास्त आहेत. त्यामुळे एकविचारी लोक एकत्र आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.