MI vs RR, IPL 2023 : वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सचा नवा विक्रम, 200 हून अधिक धावांचं लक्ष्य पार करत ऐतिहासिक कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स (MI vs RR) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात विजय मिळवला. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्सने विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गडी गमावून 212 धावा केल्या. जैस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 124 धावांची खेळी केली. त्याचबरोबर या मोसमात तिसऱ्यांदा मुंबईविरुद्ध एका संघाने 200 हून अधिक धावा केल्या आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. टीम डेव्हिड शेवटच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही संघाने 200 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पार केलं आहे.
वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सने नवा इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडिअम 200 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश मिळवणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच एका संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना यश मिळालं आहे. सुर्यकुमार यादवनंही दमदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी केली.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. मुंबईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवून या सामना अविस्मरणीय ठरवला आहे.
वानखेडेवर 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबई संघाने यशस्वीरित्या केला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रविवारी (20 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मुंबई संघाने केला.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच एका संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना यश मिळालं आहे.