सुंदर दिसण्यासाठी Vitamin E चे सेवन ठरेल घातक, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर दुष्परिणाम
व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे आपल्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. त्यासोबत कोलेजन वाढवते, त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हिटॅमिन ई त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर करते आणि पिंपल्स कमी करण्यात मदत करते.
दरम्यान, व्हिटॅमिन ईचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आरोग्यसंबंधित समस्या असलेल्या व्यक्तीने व्हिटॅमिन ईचे अतिसेवन केल्यास मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
निरोगी व्यक्तीने व्हिटॅमिन ई चे सेवन करणे उपयुक्त असते. मात्र, याचे प्रमाण जास्त झाल्यासरक्तस्राव होण्याचा धोका असतो. वारफेरीन सारख्या रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेत असलेली रुग्णासाठी हे अत्यंत घातक ठरू शकते.
व्हिटॅमिन ईचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र याचे अतिसेवन केल्यास थकवा, अशक्तपणा, उलटी होणे आणि जुलाब होणे, अशा समस्या उद्भवू शकतात.
व्हिटॅमिन ईचे अतिसेवन केल्यास रक्तासंबंधित आजार आणि इतर धोका वाढतो. यामुळे व्हिटॅमिन ईचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
शेंगदाणे, पपई आणि मासे हे व्हिटॅमिन ईचे नैसर्गिक स्त्रोत आहे. याचा आहारात समावेश करता येईल. व्हिटॅमिन के युक्त हिरव्या भाज्यांचे सेवन करणेही फायदेशीर ठरेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.