Numerology : 'ब्युटी विथ ब्रेन' असतात 'या' जन्मतारखेच्या मुली, आयुष्यात प्रवेश करताच होते भरभराट
आपल्या मूलांकावरुन, आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये परिस्थिती कशी असेल याबद्दल बरीच माहिती मिळते. अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही स्वतःबद्दलही बरेच काही जाणून घेऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंक ज्योतिष शास्त्रामध्ये मूलांक 5 असलेल्या मुलींना खूप खास मानलं जातं. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह ज्ञान आणि बुद्धीचं प्रतिक आहे, त्यामुळे मूलांक 5 असलेले लोक खूप बुद्धिमान असतात.
अंकशास्त्रात, 5 क्रमांकाला खूप महत्त्व आहे. पूजेमध्ये 5 अंकांला महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच या मूलांकाचे लोकही खास मानले जातात.
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हा मूलांक असलेल्या महिला खूप बुद्धिमान आणि निर्भय असतात. या मुली त्यांचं प्रत्येक काम अतिशय प्रामाणिकपणे करतात.
मूलांक 5 असलेल्या मुली खूप हुशार असतात. या मुली 'ब्युटी विथ ब्रेन' असतात. त्या कोणतंही काम खूप लवकर शिकतात आणि त्यामध्ये तरबेज होतात.
या मुली खूप भावनिकही असतात. त्यांना नवीन संबंध बनवण्यात खूप आनंद मिळतो. स्वभावाने अतिशय मनमिळावू असल्याने त्यांचे मित्रही मोठ्या प्रमाणात आहेत. प्रेमसंबंधही चांगले राहतात.
या मुली धैर्यवान आणि मेहनती असतात. मेहनत आणि बुद्धीच्या बळावर या सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण करतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.