'या' टॉप अभिनेत्रीचं 5 स्टार्ससोबत होतं अफेअर? प्रभाससोबतही जोडलं नाव; वयाच्या 43 व्या वर्षीही सिंगल
आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या एक किंवा दोन नाही तर 5 स्टार्ससोबत अफेअरची चर्चा होती. पण, ही सुंदरी अजूनही सिंगल आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या एका अभिनेत्रीच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. अभिनेता प्रभाससोबत बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या अफेअर क्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का शेट्टी तेलुगू सिनेमामधील मोठं नाव आहे.
अनुष्का शेट्टीच्या अफेअर बातम्या इंटरनेटवर व्हायरल होतं आहेत. दरम्यान, अनुष्काच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनुष्काचे नाव 5 स्टार्ससोबत जोडण्यात आलं.
अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने अभिनेता नागार्जुन याच्यासोबत 'सुपर' चित्रपटातून फिल्मी करियरला सुरुवात केली. 'मास' आणि 'अरुंधति' यासारख्या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.
'बाहुबली' चित्रपटामुळे अनुष्का शेट्टीला खरं स्टारडम मिळालं. तिने 'मिर्ची', 'बाहुबली', 'बाहुबली 2' यासारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय ती 'भागमती' और 'निशब्दम' या चित्रपटांमध्येही दिसली. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत.
अनुष्का शेट्टी चित्रपटाची ऑफर स्वीकारताना खूप विचारपूर्वक निर्णय घेते. आता ती कृष जागर्लामुडी दिग्दर्शित 'घाटी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
'घाटी' चित्रपटाचा ट्रेलर याआधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये अनुष्काच्या रुद्रावतार पाहून चाहते चित्रपट पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना अनुष्का शेट्टीच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे.
अनुष्का शेट्टीने अलीकडेच एका कार्यक्रमात तिच्या फेअर्सच्या चर्चांवर भाष्य केलं. तिने सांगितलं की, आतापर्यंत माझं अफेअरच्या अफवा अनेक वेळा अफवा पसरल्या. माझं नाव 5 सेलिब्रिटींसोबत जोडलं गेेलं, पण त्या सर्व अफवा होत्या.
अभिनेत्री अनुष्का शेट्टी प्रभास, सुमंत, सेंथिल, गोपीचंद आणि आणखी एका अभिनेत्यासोबत अफेअर असल्याची चर्चा होती. याशिवाय, अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या.