Urine Therapy : लघवी सेवन आरोग्यासाठी फायदेशीर? युरिन थेरपी म्हणजे काय? जाणून घ्या
आजारी असल्यावर डॉक्टर आपल्याला फळांचा किंवा भाज्यांचा रस सेवन करण्यास सांगतात. पण, आता मूत्र (Urine) सेवन केल्यानेही आरोग्य चांगले राहते, असेही बोलले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या इंटरनेटवर असे अनेक अहवाल समोर आले आहेत. या रिपोर्टनुसार, मूत्र सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या अहवालानुसार लघवी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. लघवीमुळे त्वचेशी संबंधित आजारांपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंतच्या आजारांपासून मुक्ती मिळते, असा दावाही केला जात आहे.
दरम्यान, यामागे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत आणि असे केल्याने आरोग्याला अधिक हानी पोहोचू शकते, असे अनेक आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. युरिन पिण्याच्या फायदे आणि त्याबद्दल आरोग्यतज्ज्ञांचं मत काय आहे ते वाचा सविस्तर...
काही रिपोर्टनुसार, चीनमधील लोक स्वतःचं मूत्र पितात. यासोबतच लोक लघवीने डोळे आणि चेहराही स्वच्छ करतात. असे केल्याने चेहऱ्याची चमक आणि डोळ्यांचा क्षमता कायम राहते, असा लोकांचा विश्वास आहे.
युरिन थेरपीनुसार लघवी वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. चीनमधील काही लोक चहाप्रमाणेच लघवी पितात आणि चेहऱ्यावरही लावतात. डोळ्यांमध्ये ड्रॉपप्रमाणे ही मूत्राचा वापर करतात, असंही सांगितलं जातं.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, लघवी पिण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहेत. या प्रक्रियेला यूरोफॅगिया किंवा यूरोथेरपी म्हणतात. यामध्ये मूत्राचा शरीरातील समस्या दूर करण्यासाठी वापरला जातो.
प्राचीन रोम, ग्रीस आणि इजिप्तमधील अनेक रिपोर्टनुसार, मुरुमांपासून कर्करोगापर्यंत सर्व गोष्टींवर उपचार करण्यासाठी यूरो थेरपी वापरली जात होती, असं म्हटलं जातं.
असं सांगितलं जातं की, जुन्या काळात डॉक्टर लघवीतून रुग्णाला मधुमेह आहे की नाही हे तपासायचे. पण, मूत्र सेवन आरोग्यासाठी लाभदायक आहेत याबाबतचे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
वैद्यकीय शास्त्रावर आधारित रिपोर्टनुसार, मूत्र सेवन केल्याने बॅक्टेरिया, विषारी आणि इतर हानिकारक पदार्थ तुमच्या रक्तात प्रवेश करु शकतात.
लघवी हा आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कचरा असतो आणि ज्यामध्ये दूषित पदार्थ, जीवाणू असतात. हे जीवाणू शरीरात गेल्यावर गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकतात. त्याचा तुमच्या किडनीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.