UN Report On Diet: भयावह! भारतात 100 कोटींहून अधिक लोक सकस आहारापासून वंचित, UN चा अहवाल
युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की, 2021 मध्ये, भारतातील 100 कोटींहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकले नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अहवालानंतर भारत सरकारच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये केवळ 81 कोटी लोकांना अन्नाच्या मदतीची गरज असल्याचं सांगण्यात आलं होतं.
संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अन्नसुरक्षा आणि पोषण संबंधी 2023 च्या अहवालात असं दिसून आलं आहे की, भारतातील सुमारे 104 कोटी लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत.
आरोग्यदायी आहाराशी संबंधित अहवालात भारताचा क्रमांक फक्त पाकिस्तानपेक्षा कमी आहे.
या अहवालानुसार, पाकिस्तानातील 82 टक्के लोकांना सकस आहार मिळत नाही. म्हणजे, 24 कोटी लोकांपैकी सुमारे 19 कोटी लोकांना चांगला सकस आहार मिळत नाही.
सन 2021 मध्ये बांगलादेशातील एकूण लोकसंख्येपैकी 66 टक्के, इराणमध्ये 30 टक्के, चीनमध्ये 11 टक्के, रशियामध्ये 2.6 टक्के, अमेरिकेत 1.2 टक्के आणि ब्रिटनमधील 0.4 टक्के लोकांना सकस आहार मिळत नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेसह इतर एजन्सींचा अहवाल अशा वेळी आला आहे की, जेव्हा काही अन्न सुरक्षा समर्थक आणि पोषण तज्ज्ञ भारत सरकारच्या अन्नटंचाई आणि खराब पोषणाची समस्या कमी करण्याच्या प्रयत्नांवर टीका करत आहेत.
केंद्र सरकारनं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाला आव्हान देत म्हटलं आहे की, हा आकडा एका सर्वेक्षणावर आधारित आहे, ज्यामध्ये आठ प्रश्न आणि 3 हजार लोकांच्या मतांचा समावेश करण्यात आला आहे.
यावर सरकारनं म्हटलं की, भारतासारख्या देशाच्या छोट्या नमुन्यातून गोळा केलेला डेटा भारतातील कुपोषित (लोकसंख्येचं) प्रमाण मोजण्यासाठी वापरला गेला आहे, जो केवळ चुकीचा आणि अनैतिक आहे.