Health tips :टीव्ही - मोबाईल पाहता-पाहता झोपण्याची सवय आहे का?
हीच गरज सवयीत बदलल्यानंतर त्याचा प्रचंड वाईट परिणार आरोग्यावर होतो. आता प्रत्येक जण वेग-वेगळ्या सीरिजच्या प्रेमात आहेत. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध थाटणीचे सिनेमे आणि सीरिज उपलब्ध आहेत.(Photo credit: Unsplash)
सांगायचं झालं तर, कोविड – 19 पासून जगभरात ओटीटी धारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लोकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मचं व्यसन लागलं आहे. (Photo credit: Unsplash)
ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. टीव्ही, मोबाईल पाहता – पाहता लोकं झोपतात. ज्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो.(Photo credit: Unsplash)
असे सांगण्यात जे लोक टीव्हीच्या प्रकाशात झोपत होते त्यांच्यामध्ये इन्सुलिनची पातळी बिघडली होती. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. (Photo credit: Unsplash)
अशा लोकांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. एवढंच नाही तर, बीपी, शुगर आणि लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो…(Photo credit: Unsplash)
अनेक तरुणांमध्ये ही सवय आहे. तरुण रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल घेतात आणि वेळ कसा निघून जातो तरुणांना कळत नाही. (Photo credit: Unsplash)
अशात तरुणांची झोप कमी होते. म्हणून स्नायू दुखणे किंवा इतर स्नायू संबंधित समस्या असू शकतात.(Photo credit: Unsplash)
काम असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करा. वेग-वेगळ्या विषयांवर आधारित पुस्तकं वाचण्यावर भर द्या ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. योग्य आहार आणि पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)