Newborn Baby Care Tips : नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
तसेच त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. बाळाचे अंग पोट रगडू नये, हात, पाय हलक्या हाताने चोळावेत(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदूध, हळद डाळीचे पीठ एकत्र करून अंगास लावावे व नंतर पाण्याने किंवा साबणाने अंग स्वच्छ धुवावे. (Photo Credit : Pixabay)
बाळाच्या त्वचेवर जी लव असते ती चोळून काढण्याचा प्रयत्न करू नये. आंघोळ झाल्यावर मऊ स्वच्छ फडक्याने बाळाचे अंग टिपावे. जोराने पुसू नये.(Photo Credit : Pixabay)
आंघोळीनंतर बाळाला काजळ घालण्याचे काहीच कारण नाही. काजळाने डोळे मोठे होतात, डोळे स्वच्छ राहतात हे सारे चुकीचे आहे. उलट काजळ घातल्याने काजळाने किंवा अस्वच्छ बोटांमुळे जंतूदोष निर्माण होऊ शकतो. काजळ लावल्यामुळे दृष्ट लागत नाही, अशाही भोळ्या समजुतीने काजळ लावले जाते तेही चुकीचे आहे.(Photo Credit : Pixabay)
टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. तसे करण्याचे काहीच कारण नाही. (Photo Credit : Pixabay)
कारण मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात. साधारणपणे एक ते दीड वर्षात ती जुळून येतात. ती जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.(Photo Credit : Pixabay)
त्याला किडा मुंगी चावली असेल किंवा डास, ढेकूण चावले असावेत. बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत.(Photo Credit : Pixabay)
बाळाचे कपडे सैल असावेत. सुती असावेत. थंडीच्या दिवसात गरम कपडे असावेत पण ते आतून मऊ असावेत. प्लास्टिक चड्डी, नायलॉनचे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ओले केलेले कपडे त्वरित बदलावेत. कपडे स्वच्छ असावेत.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)