Health Tips : ...म्हणून कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येतात; 'हे' आहे कारण
कांदा हा सर्वांनाच माहित आहे. ही एक अतिशय साधी फळभाजी आहे जी आपल्या सर्व घरांमध्ये रोज वापरली जाते. जेवणातील प्रत्येक पदार्थांत कांद्याचा वापर केला जातो. जसे की, डाळ, भाजी, भजी, पुलाव भात अशा प्रत्येक पदार्थांत कांद्याचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कांद्यामध्ये असे कोणते गुणधर्म असतात ज्यामुळे डोळ्यांतू पाणी येतं?
कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू तर येतातच, पण त्यामुळे डोळ्यांना तीव्र जळजळ आणि खाज सुटू लागते.
खरंतर, कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचे रसायन असते. या रसायनामुळे डोळ्यांत पाणी येते. डोळ्यांच्या अश्रू ग्रंथींवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.
जपानमध्येही या विषयावर संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनानुसार, कांदा कापताना डोळ्यांत पाणी येण्याचे कारण लॅक्रिमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाइम आहे.
जेव्हा आपण कांदा कापतो किंवा सोलतो तेव्हा त्यात असलेले लॅक्रिमेट्री-फॅक्टर सिंथेस एन्झाइम हवेत मिसळते. यानंतर हे एन्झाइम सल्फेनिक ऍसिडमध्ये बदलते आणि आपल्या डोळ्यांत येऊ लागते.
कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येत असले तरी याउलट अनेक गुण कांद्यामध्ये असतात. कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई चांगल्या प्रमाणात आढळतात आणि सोडियम, पोटॅशियम, लोह आणि आहारातील फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक असतात.
आपल्याला कांद्यापासून फॉलिक अॅसिडही मिळते. दुसरीकडे, या सर्वांव्यतिरिक्त, ते अन्नाची चव देखील वाढवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.