Shah Rukh Khan Tweet: 'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' चाहत्याचा मजेशीर प्रश्न; शाहरुखनचं भन्नाट उत्तर
शाहरुख (Shah Rukh Khan) ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांची उत्तरं देतोय.
Shah Rukh Khan
1/10
शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे.
2/10
शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीनं उत्तरं देत आहे. काही चाहत्यांनी शाहरुखला हटके प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
3/10
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या मन्नत या बंगल्यासमोरील फोटो शेअर करुन त्याला विचारले, "वाट पाहत होतो, तू आला का नाही?' या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अरे, तेव्हा मी बेडवर चिल करत होतो.'
4/10
'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' असा प्रश्न देखील एका युझरनं शाहरुखला विचारला.
5/10
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं उत्तर दिलं, 'चित्रपट बघून घे, गर्लफ्रेंड बनवायला अख्खं आयुष्य आहे.'
6/10
दुसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, तुम्ही कपिल शर्मामध्ये यावेळी येणार आहात का?' या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'भावा, मी आता चित्रपटगृहात येणार आहेत. तिथेच भेटूयात." शाहरुखच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
7/10
एका ट्विटर युझरनं शाहरुखला प्रश्न विचारला, "पठाणमध्ये किस करणार आहेस का?" या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "मी किस करणार नाही, तर किक मारणार आहे."
8/10
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
9/10
हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत पठाण हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
10/10
पठाणमध्ये मध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोणआणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
Published at : 22 Jan 2023 01:12 PM (IST)