Mobile Use : सावधान! टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणं आरोग्यासाठी घातक, 'हे' आहे कारण
मोबाईल फोनमुळे सर्व जग जवळ आलं आहे. आपण यावर इतके अवलंबून आहोत की, यापासून दूर जाणंही कठीण झालं आहे. ( Image Source : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल जणू आपला एक अविभाज्य घटक बनला आहे. काही लोक तर जेवणाच्या टेबलापासून अगदी वॉशरुमपर्यंतही मोबाईल फोन घेऊन जातात. ( Image Source : istockphoto )
अनेक लोकांना टॉयलेट सीटवरुन बसून फोन वापरण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. ( Image Source : istockphoto )
जर तुम्ही वॉशरुममध्ये फोन वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. ( Image Source : istockphoto )
जर तुम्हालाही वॉशरूममध्ये मोबाईल फोन वापरण्याची सवय असेल तर, ही सवय आताच सोडा. हे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहे. ( Image Source : istockphoto )
अमेरिकेतील सॅनिटायजिंग कंपनी वायोगार्डने याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार, 73 टक्के लोक टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरतात. 11 ते 26 वर्ष वयोगटातील 93 टक्के लोक वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरतात. ( Image Source : istockphoto )
या संशोधनात सामील झालेल्या 11 ते 26 वर्ष वयोगटातील अनेकांनी सांगितलं की वॉशरुममध्ये जाऊन मोबाईलवर गेम खेळतात किंवा चॅट करतात. ( Image Source : istockphoto )
वॉशरुममध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचणे किंवा पुस्तक वाचण्याचीही काही लोकांना सवय असते. पण ही सवयही खूप धोकादायक ठरु शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही सवय बदलणे गरजेचं आहे.( Image Source : istockphoto )
वॉशरुममध्ये फोन वापरताना तो कमोडमध्ये पडण्याचा धोका असतो. पण यासोबतच या मोबाईल फोनमुळे तुम्ही आजारी पडण्याचा आणि संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो.( Image Source : istockphoto )
तज्ज्ञांच्या मते, वॉशरुममध्ये मोबाईल फोन वापरण्याची तुमची सवय तुम्हाला फार महागात पडू शकते. वॉशरुममध्ये मोबाईल वापरल्याने तुम्ही आजारी पडण्याचा धोका असतो.( Image Source : istockphoto )
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा लोक टॉयलेट करताना कमोडवर बसतात तेव्हा त्यांच्या कंबर आणि नितंब या भागांतील नसांवर दबाव पडतो. ज्या स्थितीत लोक टॉयलेट सीटवर बसून शौच करतात. त्यावेळी तेथील नसांवर दबाव येतो. त्यामुळे मूळव्याधसारखा आजार होण्याची धोका असतो. ( Image Source : istockphoto )