Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खा आणि वजन कमी करा; डाएटिंगची गरज भासणार नाही
उन्हाळा सुरु झाला आहे. अशातच बाजारात सीझनल फळे दिसायला सुरुवात झाली. त्यातलाच एक म्हणजे फळांचा राजा आंबा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात असे अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन अगदी सहज कमी करू शकता.
आंबा - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खूप आवडतो. आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंबा फक्त खाण्यासाठीच रुचकर नसून अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी आढळते. आंब्यामध्ये भरपूर फायबर असते.
कलिंगड - कलिंगड हे उन्हाळ्यातील प्रत्येकाचे आवडते फळ आहे. हे पाण्याने समृद्ध फळ आहे. कलिंगडात 92 टक्के पाणी असते. कलिंगड खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला खूप कमी कॅलरीज मिळतात. कलिंगडात व्हिटॅमिन ए, बी6, सी, अमिनो अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात.
पीच - पीचमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. पीच खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया मजबूत होते, त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अननस - उन्हाळ्यात अननसही मुबलक प्रमाणात येते. अननसात अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अननस हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही.
टरबूज - उन्हाळ्यात गोड-गोड टरबूज खायला सर्वांनाच आवडते. टरबूजात व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते. टरबूज खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. यामुळे त्वचा चमकदार होते.
आलुबुखार - वजन कमी करण्यासाठी तुम्ही आलुबुखार खाऊ शकता. आलुबुखारमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. प्लममध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. आलू बुखारा खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.