Health Tips : हिवाळ्यात रोज मेथीचे दाणे खाण्याचे फायदे अनेक; मासिक पाळीचा त्रासही होईल कमी
मेथीचे दाणे आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतज्ञांच्या मते, एक चमचा मेथीमध्ये 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम प्रथिने आणि 1 ग्रॅम फॅट असते. हे मॅग्नेशियम, लोह आणि मॅंगनीजचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते.
मेथी हा आपल्या स्वयंपाकघरातील फायदेशीर मसाल्यांपैकी एक आहे.
तुम्ही मेथी कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यास तुम्हाला नेहमीच फायदे मिळतात.
मेथी पचनसंस्था आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पाचन तंत्रासाठी खूप फायदेशीर आहे.
मेथीमुळे केस मजबूत होतात आणि ते तुटण्यापासून संरक्षण करतात. मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
मेथीच्या दाण्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. जे पीरियड्स दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.