PHOTO : चेहऱ्याची त्वचा कोरडेपणामुळे कवचासारखी बाहेर येतेय? मग 'हे' उपाय करा
त्वचेला पुरेसा ओलावा आणि पोषण मिळत नसल्याने कोरडी त्वचा ही समस्या बनते. कोरड्या त्वचेची समस्या जास्त वाढली की चेहऱ्याची कातडी बाहेर पडू लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाहजिकच त्वचा सोलणे हे निरोगी त्वचेचे लक्षण नाही किंवा यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. अशावेळी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब करूनही या समस्येवर मात करता येऊ शकते.
खरंतर घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या त्वचेचा कोरडेपणा दूर करतात, ज्यामुळे फ्लॅकी स्किनपासूनही सुटका होते आणि त्वचा पुन्हा एकदा सुधारू शकते.
त्वचा जास्त कोरडी होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळत नाही, हवामानात बदल होणे, हवेचा जास्त कोरडेपणा येणे, हीटरसमोर बसणे, गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा तोंड धुणे, कठोर रसायने वापरणे किंवा वारंवार तोंड धुणे इत्यादी.
कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. हे तेल लावल्याने त्वचेला ओलावा लॉक करणारे आवश्यक घटक मिळतात. आपण दिवसातून एक ते दोन वेळा नारळ तेल लावू शकता.
त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात कोरफडीचाही चांगला परिणाम होतो. कोरफडीचे ताजे पान कापून पल्प काढून टाका किंवा कोरफड जेल वापरा. हे चेहऱ्यावर लावा आणि काही तासांनी चेहरा धुवा. रात्रभर हे जेल चेहऱ्यावर लावून झोपणे देखील एक चांगला पर्याय असेल.
ग्लिसरीनमुळे त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते आणि चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो. यामुळे त्वचेवरील खाज सुटते. एका बाऊलमध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबजल मिसळा. हे चेहऱ्यावर लावा आणि तासाभरानंतर चेहरा धुवा. रोज याचा वापर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होईल.
सहसा, चेहऱ्यावरील ऑईल काढून टाकण्यासाठी मुलतानी माती लावली जाते. परंतु, त्याचा योग्य वापर केल्यास चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होण्यासाठीही मुलतानी माती प्रभावी ठरते.
2 चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा दूध किंवा मध आणि एक चमचा काकडीचा रस मिसळून फेसपॅक तयार करा. त्यानंतर १५ मिनिटे पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून एकदा लावल्यास त्याचा परिणामही दिसेल.