Health Tips : 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; अशक्तपणा होईल दूर
पालक - पालक हे पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड आहे. आरोग्य तज्ञ पालक हे पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी अन्न मानतात. पालक एनर्जीने भरलेला असतो आणि त्यात खूप कमी कॅलरीज असतात. पालक हे व्हिटॅमिन ए आणि के यांचा चांगला स्त्रोत मानला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसूण - लसणाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. लसणात बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. शतकानुशतके रोगांपासून संरक्षण म्हणून त्याचा वापर केला जातो. शक्तिशाली दाहक-विरोधी लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
लिंबू - लिंबूने हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुपरफूड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या लिंबूवर्गीय फळामध्ये दाहक विरोधी गुण तर आहेतच. पण ते शरीरात कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून रोखू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यांइतकेच असते. लिंबू आपल्या यकृत आणि आतड्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे.
डार्क चॉकलेट - चॉकलेटमध्ये उच्च अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे रोगदेखील प्रतिबंधित करतात. डार्क चॉकलेट कॅन्सरपासून बचाव करते.
बीट - बीट केवळ आपल्या मेंदूसाठी चांगले नाही तर ते रक्तदाबही नियंत्रित ठेवते. ते खाल्ल्याने व्यायामाची कार्यक्षमता वाढते. आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो. या भाज्यांमध्ये फॉलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात.
कडधान्ये - मसूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या हृद्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहेतच पण वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढविण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सॅल्मन फिश - सॅल्मन फिश ओमेगा-3 फॅटी एॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे नैराश्य तसेच हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यामध्ये उच्च प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे देखील चांगले असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.