Health Tips : हिवाळ्यात हाडांना मजबूत करायचंय? किवीचे सेवन करा
किवी खाल्ल्याने तुमची त्वचा तर सुधारतेच, याशिवाय किवी खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हाडांसाठी किवी हे फळ किती चांगलं आहे हे सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात आपल्या हाडांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पोषक तत्वे घेणे आवश्यक आहे. किवीमध्ये सर्वाधिक फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असते.
त्वचेसाठी किवी खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा डॉक्टर देखील किवी खाण्याचा सल्ला देतात.
किवी खाल्ल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच हाडे मजबूत होतात. म्हणूनच हिवाळ्यात हे फळ तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी खूप गुणकारी मानले जाते.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबासारखी समस्या आहे त्यांनी दिवसातून दोन ते तीन वेळा किवी फळाचे सेवन करावे.
किवीला जीवनसत्त्व आणि पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. हे खाल्ल्याने माणसाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
हे फळ थोडे महाग असल्याने अनेक लोक याची खरेदी करणे टाळतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे फळ तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
किवी हा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा चांगला पर्याय मानला जातो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.