PHOTO: 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
'बिग बॉस ओटीटी'चा विजेता (Bigg Boss OTT) एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये (Noida) एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप आहेत. नोएडा (Noida) आणि एनसीआरमध्ये (NCR) विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
याच कारणाने नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो.
विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.
एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता ठरला आहे. एल्विश हा लोकप्रिय युट्यूबर आहे.
युट्यूबवर त्याचे तीन चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावतो.
एल्विशचा दिल्लीत आलिशान बंगला आहे.
एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी'नंतर एल्विश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आला आहे.