Urfi Javed Arrested: उर्फी जावेदला कॅफेबाहेरून अटक? व्हिडिओ व्हायरल!
आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे.
'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे.
पण करण जोहरच्या (Karan Johar) 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.
शुक्रवारी सकाळी अचानक एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. उर्फी एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे. जिथे दोन महिला पोलीस तिला ताब्यात घेत आहेत.
उर्फीला त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात घेऊन जातात. त्यावेळी उर्फी त्यांना त्यामागचं कारण विचारते. त्यावर त्या पोलीस अधिकारी म्हणतात,एवढे छोटे-छोटे कपडे परिधान करून कोण फिरतं?.
उर्फीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा बॅकलेस टॉप आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे.
उर्फीच्या या व्हिडीओवर चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी हा प्रँक असून ती मस्करी करतेय असं म्हटलं आहे.
तर तिचे चाहते मात्र चिंता व्यक्त करत आहेत.
उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत.