Health Tips : प्रसूतीनंतर 'अशा' प्रकारे पाणी पिणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं; योग्य पद्धत जाणून घ्या
सी-सेक्शन किंवा नॉर्मल प्रसूतीनंतर थंड पाणी पिऊ नये असा सल्ला घरातील ज्येष्ठ मंडळी अनेकदा देताना तुम्ही ऐकलं असेल. या दरम्यान थंड पाणी प्याल तर पोट बिघडेल. आता प्रश्न असा आहे की सी-सेक्शन किंवा नॉर्मल प्रसूतीनंतर थंड पाणी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो का? यावर डॉक्टरांचे मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे. जे अनेक लोक फॉलो करत नाहीत. डॉक्टरांच्या मते, प्रसूतीनंतर योग्य जीवनशैली आणि आहाराचे पालन करणं खूप महत्वाचं आहे. याबरोबरच पाणी पिण्याची योग्य पद्धतही अवलंबली पाहिजे. यामुळे तुमचे पोट अजिबात फुगणार नाही आणि तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे तंदुरुस्त दिसाल.
डॉक्टरांच्या मते, प्रसूतीनंतर योग्य जीवनशैली आणि आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. याबरोबरच पाणी पिण्याची योग्य पद्धतही अवलंबली पाहिजे. यामुळे तुमचे पोट अजिबात फुगणार नाही आणि तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे तंदुरुस्त दिसाल.
पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टरांच्या मते, एकदमच भरपूर पाण्याचे सेवन करू नये. ठराविक वेळेने पाणी प्यावे. नियमित पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. तसेच, पाणी बसून आरामात प्यावे.
प्रसूतीनंतर, तुम्ही दररोज 3-4 लीटर पाणी प्यावे. जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल, तर तुमच्यासाठी दररोज 3-4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण आईच्या दुधात 80% पाणी असते.
प्रसूतीनंतर, दररोज 3-4 लिटर पाणी प्यावे. यामुळे कंबर आणि पाठदुखीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो. प्रसूतीनंतर शरीराच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.
प्रसूतीनंतर पाणी कमी प्यावे असेही सांगितले जाते. पण हे एक मिथक आहे. प्रसूतीनंतर, दररोज 3-4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुमचे शरीर डिटॉक्सिफिकेशन करू शकेल आणि वाढलेले वजन देखील नियंत्रित करेल.
प्रसूतीनंतर फक्त गरम पाणी प्यावे असे तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींकडून अनेकदा ऐकले असेल. डॉक्टरांच्या मते, प्रसूतीच्या खोलीच्या तापमानानुसारच पाणी प्यावे. खूप थंड किंवा गरम पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा ते रूम टेंम्प्रेचननुसार प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.