Health Tips : हिवाळ्यात संध्याकाळी 'या' पदार्थांचं कधीही सेवन करू नका; गंभीर परिणाम होतील
अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत ज्या हिवाळ्यात खाण्याची शिफारस केली जाते, परंतु संध्याकाळनंतर या गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्यावर खूप परिणाम होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणून घेऊया संध्याकाळनंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.
हिवाळ्यात संध्याकाळी दह्याचे सेवन करू नये कारण यामुळे खोकला आणि सर्दीचा त्रास वाढू शकतो. याशिवाय दह्याचे अपचन झाल्यामुळे पोटदुखी आणि उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात केळी खाणे टाळावे. केळीमुळे तुम्हाला प्रचंड थंडीत श्वसनाचा त्रास होऊ शकतो आणि त्याचवेळी सायनसचा त्रासही होऊ शकतो.
हिवाळ्याच्या संध्याकाळी, अनेकजण कॉफी आणि चहाचा पितात. पण, हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं, कॅफिनचं जास्त प्रमाणात सेवन शरीरासाठी नुकसानकारक आहे.
गाजरमध्ये फायबरचे प्रमाण चांगलं असते आणि ते थंडीतही खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हिवाळ्यात संध्याकाळनंतर गाजराचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. गाजराचा पिवळा भाग खूप गरम असतो, त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते.
हिवाळ्यात रात्री काकडी खाणे टाळा कारण त्यात 90% पाणी असते. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय तुमची झोप देखील बिघडू होऊ शकते कारण काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते.
हिवाळ्याच्या संध्याकाळी आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स टाळावं. यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. या गोष्टींचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि पचनसंस्थेलाही हानी पोहोचते.