Health Tips : बीटच्या ज्यूसचे एक नाही, दोन नाही, तर आहेत अनेक फायदे

Beetroot Juice Benefits
1/7
बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते, त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. जाणून घ्या बीटचा ज्यूस पिण्याचे फायदे.
2/7
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो. या रसामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. नायट्रिक ऑक्साईड रक्त पेशींना आराम देते आणि रक्त प्रवाह सुधारते.
3/7
व्यायाम करण्यापूर्वी बीटचा रस प्यायल्यास स्टॅमिना वाढतो. एक ग्लास बीटरूट ज्यूस प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते. याच्या मदतीने तुम्ही वेगवान व्यायाम सहज आणि जलद करू शकता. असे व्यायाम केल्याने शरीरात सहनशीलता निर्माण होते.
4/7
बीटरूट ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. यामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरविरूद्ध प्रभावी आहेत. बीटरूटचा अर्क पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीर निरोगी राहते.
5/7
जे लोक रोज बीटचा रस पितात त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
6/7
बीटमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. बीटरूटमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे मज्जासंस्था आणि स्नायू निरोगी होतात. यामध्ये आढळणारे मॅंगनीज हाडे, यकृत आणि किडनीसाठी चांगले असते.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 30 Sep 2023 07:18 PM (IST)