Fashion Tips : जर तुम्हाला हाय हिल्स घालून चालताना त्रास होत असेल तर 'या' पद्धतींचा करा अवलंब
आजकाल मुलींसाठी हाय हिल्स घालणे हा फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण उंच दिसण्यापासून ते ट्रेडिंग फॅशन आणि कॉन्फिडन्स बूस्टरपर्यंत, हाय हिल्स मुलींचे सौंदर्य वाढवतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, फॅशनच्या या जमान्यात हिल्स घालणे अजूनही अनेक मुलींसाठी अवघड जाते आणि त्यांना ईच्छा असून देखील त्या हाय हिल्स घालू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हाय हिल्स घालून चालताना त्रास होत असेल, तर काही पद्धतींच्या मदतीने तुम्हाला हाय हिल्स घालणे सोपे जाऊ शकते.
खरं तर, बहुतेक मुलींना हाय हिल्स घालण्याची सवय नसते. अशा परिस्थितीत, विशेष प्रसंगी हाय हिल्स घातल्यामुळे, त्यांच्या पायांना दुखणे आणि ताण येऊ लागतो. त्यामुळे मुलींना खूप अस्वस्थ वाटू लागते.
म्हणूनच हाय हिल्स घालण्याच्या काही खास टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही कोणत्याही प्रसंगी हाय हिल्स घालू शकता.
हाय हिल्स खरेदी करताना पायांच्या आकाराकडे लक्ष देण्यास विसरू नका. यासाठी चांगल्या ब्रँडच्या हाय हिल्सचीच निवड करा. तुमच्या पायाच्या आकारानुसार ब्रँडेड हाय हिल्स घालणे तुमच्यासाठी खूप आरामदायी ठरू शकते.
जर तुम्हाला हाय हिल्स घालण्याची सवय नसेल, तर पहिल्यांदाच हिल्स घालणे खूप विचित्र वाटू शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी हाय हिल्स घालण्याआधी त्यांना घरी घालण्याचा सराव करा.
हाय हिल्सची सवय लावण्यासाठी आधी ब्लॉक हिल्स घालायला सुरुवात करा. ब्लॉक हिल्स अतिशय आरामदायक असतात. पहिल्यांदा पेन्सिल हिल्स घालणे हा एक धोकादायक निर्णय असू शकतो. तसेच हिल्स घातल्यानंतर अंगठ्याऐवजी टाचांवर जोर देऊन चालण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा तुम्ही हाय हिल्स घालाल तेव्हा तुमच्या पायात टाल्कम पावडर लावा. बेबी पावडर वापरल्यास चांगले होईल. असे केल्याने तुम्हाला जास्त घाम येणार नाही.
जेव्हा तुम्हाला हाय हिल्स घालाव्या लागतील तेव्हा डबल टेप वापरा. याने तु्म्हाला आराम मिळू शकेल. असे केल्याने पायांवर फोड येणे आणि बोटांमध्ये वेदना होण्याची शक्यता देखील कमी होते.
जर तुम्हाला पहिल्यांदा हिल्स घालायची असतील तर पम्प्स घालणे सुरक्षित असेल. सुरूवातील कोणत्याही ठिकाणी जाताना कमी इंचाच्या हिल्स घालून जा. सवय झाल्यावर मग पेन्सिल हिल्स घालायला सुरूवात करा.