Tips To Remove Face Hair : चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे तुम्ही हैराण आहात?, 'या' नैसर्गिक पद्धतींचा करा वापर
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर केस असतात. पण हे केस जास्त प्रमाणात असतील तर मात्र चेहरा वाईट दिसायला लागतो. त्यामुळे मेकअप करण्यात देखील अडचण येते. अशा परिस्थितीत फेस वॅक्सिंग हा एक सोपा उपाय मानला जातो. पण हा उपाय तितकाच त्रायदायक आहे. काहीवेळा संवेदनशील त्वचेमुळे नुकसान होण्याचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत घरगुती उपाय करून तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील केसांपासून मुक्ती मिळवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडी आणि मक्याचे पीठ - एका कपमध्ये एक चमचा मक्याचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचा अंड्याचा पांढरा भाग घाला. आता चांगले फेटून घ्या. चेहऱ्यावर लावण्यासाठी प्रथम चेहरा स्वच्छ करा जेणेकरून चेहऱ्यावरील तेल वगैरे निघून जाईल. आता हे मिश्रण ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर पसरवा ते 15 मिनिटांत कोरडे होईल. आता ते मसाज केल्याप्रमाणे चोळा. तुमच्या चेहऱ्यावरील केस सहज काढले जातील.
साखर आणि मध - एक वाटी घ्या आणि त्यात एक चमचा मध, एक चमचा साखर आणि एक ते दोन थेंब पाणी मिसळा. आता चांगले एकत्र करा. आता एका भांड्यात थोडे पाणी टाका आणि गॅस चालू करा. पाणी गरम झाल्यावर त्यात तयार केलेल्या मिश्रणाची वाटी ठेवा. हळूहळू साखर वितळेल. आता ते चेहऱ्यावर लावा आणि सुती पट्टी घ्या आणि विरूद्ध दिशेने खेचत रहा.
बेसन आणि गुलाबजल - एका भांड्यात एक चमचा बेसन घेऊन त्यात थोडे तांदळाचे पीठ मिक्स करावे. आता त्यात गुलाबजल टाका आणि 2 थेंब मोहरीचे तेल टाका. आता ते चांगले फेटून स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि चोळा. सर्व केस निघून जातील.
दोन चमचे ओट्सचे जाडे भरडे पीठ केळ्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करावी लागेल. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा आणि काही मिनिटे मसाज करा. तुम्हाला ते 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावावे लागेल आणि नंतर पाण्याने धुवावे लागेल. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील केसांपासून नैसर्गिकरित्या सुटका होऊ शकते.
पपईचे लहान तुकडे करा आणि त्याची पेस्ट बनवा. नंतर त्यात अर्धा चमचा हळद घालून नीट मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे मसाज करा आणि नंतर 15-20 मिनिटे राहू द्या. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हा घरगुती उपाय करा.
साखर आणि लिंबाचा रस आणि थोडे पाणी मिसळा. याची पेस्ट तयार करून घ्या. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे मसाज करा आणि 10-15 मिनिटे राहू द्या. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. याने चेहऱ्यावरील केस निघून जातील.
गरजेनुसार मसूर रात्रभर भिजत ठेवा. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता या पेस्टमध्ये 5 टेबलस्पून बटाट्याचा रस, 2 टेबलस्पून लिंबाचा रस आणि 1 टेबलस्पून मध घाला. या पेस्टने चेहरा 5 मिनिटे स्क्रब करा. नंतर काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी मसूरची डाळ खूप प्रभावी ठरते . बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीच असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होतो.
एक चमचा गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडी हळद घाला. आता त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका. तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी नारळ किंवा ऑलिव्ह तेल देखील घालू शकता. आता त्यात थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. केस काढण्यासाठी ही पेस्ट वापरा.
तुम्ही चेहऱ्यावरील केसांना खोबरेल तेल लावा. सर्व प्रथम, खोबरेल तेल गरम करा. आता त्यात थोडी हळद घाला. चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. नको असलेले केस निघून जातील.