Health Tips : तुमच्या आहारात पालकाचा समावेश करा; 'या' 7 स्मार्ट पद्धती फॉलो करा

हिवाळ्यात तुम्ही पाकाचा वेगवेगळ्या पद्धतींनी तुमच्या आहारात समावेश करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही जेवणासोबत किंवा स्नॅक्स म्हणून अनेकदा सॅलडचे सेवन करत असाल तर पालकाची मूठभर पाने बारीक चिरून घ्या, लिंबाचा रस मीठ टाकून खा. यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल.

ऑम्लेट पालक हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटेल. मात्र, एकदा तुम्ही हे ऑम्लेट खाल्ल्यानंतर यातून तुम्हाला व्हिटॅमिन मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.
पालक सूप अगदी सहज बनवता येते. हे खूप चविष्ट लागते. पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
प्रत्येकाला पास्ता खायला आवडतो. लाल सॉस पास्ता असो, पांढरा किंवा मिश्रित. जर तुम्ही त्यात पालक घातलात तर ते एक उत्तम कॉम्बिनेशन होऊ शकते.
पालक चटणी सहसा उकडलेले पालक, भाजलेले शेंगदाणे, तीळ, हिरवी मिरची, लसूण, चिंच घालून आणि मोहरी आणि कढीपत्ता घालून तयार केली जाते. हे खायला खूप चवदार दिसते, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जेवणात पालकचा समावेश करू शकता आणि आरोग्यदायी फायदे मिळवू शकता.
तुम्ही पालक ब्रेडबरोबर मेयॉनिजमध्ये देखील खाऊ शकता. तसेच, पालकाची कोशिंबीर देखील चवीला फार छान लागते.
हिवाळ्याच्या ऋतूत, विशेषतः उत्तरेकडील प्रदेशांमध्ये, साग हे निःसंशयपणे सर्वाधिक खाल्ल्या जाणार्या पदार्थांपैकी एक आहे. पालक, मोहरी, बथुआ, लाल कांदा, टोमॅटो यांचे मिश्रण हिरव्या भाज्यांचा एक स्वादिष्ट पदार्थ बनवते. तुम्हाला याचा फायदा होईल आणि चवही वाढेल.