बीडच्या वैद्यनाथ अर्बनसह चंद्रपूरची कन्यका, वाई अर्बन, पाटण नागरी आणि अमरावतीची जिजाऊ व्यावसायिक बँकेवर RBI ची कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI Impose Penalty) ने देशातील 13 कोर्पोरेटिव बँकांना दंड ठोठावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा दंड नियमांचं पालन न केल्यामुळे ठोठावण्यात आला आहे. आरबीआयनं या बँकांवर 50 हजार रुपयांपासून 4 लाखांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेनं श्री कन्यका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर, (Shri Kanyaka Nagari Sahakari Bank) यांना सर्वाधिक 4 लाख रुपये आणि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बीड (Vaidyanath Urban Co-operative Bank, Beed) यांना अडीच लाख रुपये दंड ठोठावला आहे.
वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा (Wai Urban Co-operative Bank) आणि इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पाटण नागरी सहकारी बँक, पाटण (Patan Nagarik Sahakari Bank, Patan) आणि द तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय (The Tura Urban Cooperative Bank, Meghalaya) यांना वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नागरीक सहकारी बँक मर्यादीत, जगदलपूर; जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, अमरावती, ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, कोलकाता या सहकारी बँकांवर कारवाई केली आहे.
नागरीक सहकारी बँक मर्यादीत, रायगड; जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, बिलासपूर; आणि जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, शहडोल यांनी सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.
बँकांनी नियमांचं पालन केलेलं नसल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे आरबीआयने म्हटले.
बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या दंडात्मक कारवाईचा परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले.
या कारवाईमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने कळवले आहे.