Raw Onion Benefits : उन्हाळ्यात कांद्याचे सेवन आरोग्यदायी! जाणून कांद्याचे पाच फायदे
कच्च्या कांद्याचे सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कांदा केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की उन्हाळ्यात कांदा खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर जास्त उष्णतेचा कोणताही वाईट परिणाम होत नाही.
दुपारच्या जेवणात तुम्ही कांदा सॅलडच्या स्वरुपात खाऊ शकता. तसेच कांदा आणि हिरव्या कोथिंबिरीपासून तयार केलेली चटणी खाऊ शकता. जेवणानंतर बडीशेप आणि साखरेचे सेवन करा जेणेकरून तोंडाला वास येणार नाही.
कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या योग्य राहते. ज्यामुळे पोट खराब होण्यास कारणीभूत असलेले वाईट बॅक्टेरिया वाढू देत नाहीत. म्हणजेच उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी कच्चा कांदा खाणे गरजेचं आहे.
कांदा कच्चा खाल्ल्याने किंवा भाजीत घालून नियमित खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. कारण कांद्याच्या सेवनाने शरीरातील गुठळ्या होण्याची समस्या नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने कांद्याचे महत्व आहे.
कांदे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की कांद्यामध्ये आढळणारे सल्फर शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.
ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वाढलेली साखर नियंत्रीत ठेवण्याचे दृष्टीने कांदा खाम्याचे विशेष महत्व आहे.
लाल कांदा हा शरीरातील कर्करोगाच्या वाढणाऱ्या पेशी रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संशोधनात समोर आले आहे.
आपल्या सर्वांच्या शरीरात दररोज काही पेशी तयार होतात. ज्या वेळेवर काढणे गरजेचे असते. त्या जर वेळेवक काढल्या नाहीत तर पुढे कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच सकस आहाराला अधिक महत्त्व दिले जाते. कारण सकस अन्नातून मिळणारे पोषण या पेशींची वाढ होण्यापासून रोखते. कांद्याचा वापर हा देखील त्यापैकीच एक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.