Sachin Tendulkar Birthday : 50व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात, भोगवे किनाऱ्यावर फेरफटका
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज वयाचं अर्धशतक पूर्ण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिकेटचा देव त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवभूमी कोकणात पोहोचला आहे.
आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात दाखल झाला.
सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस भोगवे इथल्या समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करणार आहे.
या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसंच क्रिकेटपटूही येऊन गेले आहेत.
तर सचिन पहिल्यांदाच आपला वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा करणार आहे.
सचिन मित्रांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला असून त्याने ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे किनारी फेरफटका मारला.
यावेळी भोगवे किनारी असलेल्या पर्यटकांच्या इच्छेला मान देत त्याने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले.
सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो काढता आल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.