Weather : पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस (unseasonal rain) पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या वातावरणाचा शेती पिकांना (agricultural crops) फटका बसत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
आधीच बदलतं वातावरण आणि अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच पुन्हा आणखी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान चार डिग्रीने तर कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचंही हवामान विभागानं सांगितलं आहे.