Health Tips : पाठीचं दुखणं हलक्यात घेऊ नका; धोकादायक आजाराची असू शकतात लक्षणं
कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला अचानक पाठदुखीचा त्रास सुरू झाला तर ते हलक्यात घेऊ नका. विशेषत: दुखण्याबरोबरच, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा इतर गंभीर परिस्थितींचे लक्षण असू शकते. वेळीच उपचार सुरू करून जीव वाचवता येतो.
हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या धमन्यांमधील रक्त प्रवाह अचानक थांबतो. हे रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे किंवा रक्ताच्या गुठळ्यांमुळे होऊ शकते.
जेव्हा पुरेसे रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, पाठ, हात, पोट किंवा मान अशा शरीराच्या कोणत्याही भागात अचानक तीव्र वेदना सुरू होतात.
अशा वेदना सहसा खूप तीव्र असतात आणि हलक्यात घेऊ नका. असे काही घडल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
यापैकी कोणतेही लक्षण हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.