Health Tips : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी चांगले की वाईट?
तुम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी खा, कोल्ड कॉफी प्या, वॅनिला आईस्क्रीम खा किंवा अगदी साधं दूध प्या या सगळ्यात किंचित चॉकलेट घातलं तर त्या पदार्थाची चव आणखीनच जीभेवर रेंगाळू लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज जागतिक चॉकलेट दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
चांगल्या क्वालिटीचे डार्क चॉकलेट तसेच त्याबरोबर उच्च कोको सामग्रीसह बनवलेले चॉकलेट चवीलाही छान लागते. यामधून तुम्हाला न्यूट्रिशन मिळते. जसे की, आयर्न, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशियम, झिंक. फॅटी अॅसिडमधून मिळणारे कोको आणि डार्क चॉकलेटसुद्धा आरोग्यासाठी चांगले असतात.
डार्क चॉकलेट्समध्ये नैसर्गिक सेंद्रिय संयुगे (Organic Compounds)आढळतात. जे अॅंटिऑक्सिडेंट्सचे कार्य करतात. यामध्ये पॉलिफेनॉल यांसारखे घटक आढळतात. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कोको आणि डार्क चॉकलेटमध्ये अॅंटीऑक्सिडेंटचे प्रमाण, पॉलिफेनॉल यांसारखे अनेक घटक आढळतात.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या हृदयाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. एका अभ्यासानुसार, कोको पावडर लक्षणीयरित्या पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
जर तुम्हाला डायबिटीस, हार्टचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा.
अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, डार्क चॉकलेट तुमच्या स्किनसाठीसुद्धा फायदेशीर ठरते. यामुळे सूर्याच्या उष्णतेपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण होते. चेहऱ्यावरील रक्तपातळी वाढते. तसेच त्वचेची घनता आणि हायड्रेशनपासून बचाव होतो.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, दिवसाला 30-60 ग्रॅम चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.