Health Tips : कोथिंबिरीचे पाणी अनेक रोगांवर रामबाण उपाय
हिरवीगारी दिसणारी कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवण्याचं काम करत नाही तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोथिंबिरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.
इतकंच नाही तर कोथिंबीरमध्ये अँटीमायक्रोबियल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी असे गुणधर्मही आढळतात.
सकाळी रिकाम्या पोटी हिरवी कोथिंबीर कच्ची खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात.
हिरवी कोथिंबीर हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकते. एवढेच नाही तर ते एलडीएल कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर करू शकते.
कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज कोथिंबिरीचे पाणी पिऊ शकता.
कोथिंबीर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर घटक आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.
हिरव्या कोथिंबीरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, म्हणजेच, याचे सेवन केल्याने शरीरातील सूज येण्याची समस्या कमी होते.
अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आणि अनेक रोगांपासून आपली सुटका करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.