Health Tips : डोळ्यांच्या दृष्टीपासून ते हाडांच्या मजबूतीपर्यंत काजूचे एक, दोन नाही तर अनेक फायदे
काजूप्रमााणेच काजूचे दूधही तितकेच चविष्ट आणि फायदेशीर असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजूचं दूध खूप आरोग्यदायी आणि कमी कॅलरीयुक्त आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
काजूमध्ये पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
काजूचे दूध प्यायल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते. या दुधात अॅनाकार्डिक अॅसिड नावाचे बायो कंपाऊंड असते जे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही.
काजूमध्ये अॅनाकार्डिक अॅसिड, कार्डॅनॉल्स, बोरॉन यांसारखे अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट संयुगे असतात जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी लोह सप्लिमेंट घेण्याऐवजी तुम्ही काजूचे दूध पिऊ शकता.
लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी लोह सप्लिमेंट घेण्याऐवजी तुम्ही काजूचे दूध पिऊ शकता.
काजूच्या दुधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी असते जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते.
व्हिटॅमिन डी, फॉस्फरस कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते ज्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी राहतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.