त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; नेमकं कारण काय?
नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आजपासून आठ दिवसांसाठी बंद राहणार आहे. यामुळे तब्बल आठ दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) आठ दिवस बंद राहणार आहे.
अति प्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Trimbakeshwar Temple) संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र वरील काळात त्रिकाल पूजा, पुष्प पूजा या नित्य नैमित्तिक पूजा सुरू राहणार आहेत. मात्र कोणत्याही भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
मंदिराचे जे काही संवर्धनाचे काम होणार असून ते भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्रंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येथील शिवलिंगात ब्रह्म विष्णू महेश असे तीन उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा ज्याला स्थानिक लोक पाळ असे म्हणतात त्या पाळावरचे कवच देखील निघू लागले आहे.
या आधीच ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे उपाययोजना म्हणून मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता दिनांक 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून दिली आहे तरी सर्व भाविकांनी मंदिर प्रशासनात सहकार्य करावे अशी माहिती देण्यात आली आहे.
आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; भाविकांना दर्शन घेता येणार नाही