Health Tips : बटाटा खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या
अनेकांचा बटाट्याच्या बाबतीत असा गैरसमज आहे की, बटाटा खाल्ला तर वजन वाढतं. त्यामुळे अनेकजण बटाटा खाणं टाळतात. पण, जर तुम्ही योग्य पद्धतीने बटाटा खाल्ला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे लोक वजन कमी करत आहेत ते आहारात बटाट्याचा समावेश करू शकतात. तुम्ही बटाटे उकळून थंड झाल्यावर खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही उकडलेले बटाटे खाऊ शकता. यामुळे पोट बरोच वेळ भरलेले राहते आणि भूकही लागत नाही.
बटाट्यामध्ये स्टार्च असते ज्यामुळे चयापचय वाढते आणि चरबी कमी होते.
पोटाची चरबी कमी करायची असेल तर सोललेल्या बटाट्याचा आहारात समावेश करा. यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहील.
मात्र, उकडलेले बटाटे खात असताना एक गोष्ट लक्षात घ्या. बटाटे एका वेळी 170 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.