Health Tips : मधुमेही रूग्णांनी दूध पिताना या 3 गोष्टींचे सेवन करावे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारासोबतच वेळेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेहाच्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती देखील हळूहळू कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे शरीरात इतर अनेक रोग देखील उद्भवतात.
बदामाचे दूध मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते. बदामामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. बदामाच्या दुधातही कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
हळदीचे दूध मधुमेहाच्या रुग्णाला फायदेशीर ठरते. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे नैसर्गिक पद्धतीने मधुमेहावर फायदेशीर असतात.
हळदीचे दूध प्यायल्याने इन्सुलिनची पातळी चांगली राहते. म्हणूनच हे दूध खूप फायदेशीर आहे.
मधुमेहाचे रुग्णही दालचिनीचे दूध पिऊ शकतात. मसाला म्हणून वापरण्यात येणारी दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी तत्व आढळतात, जे साखरेची पातळी योग्य ठेवतात. त्यामुळे मधुमेही रुग्णाने दालचिनीचे दूध प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.