In Pics : अन् मैदानातच पाणावले खेळाडूंचे डोळे, श्रीलंकेवर ऐतिहासिक विजयानंतर नामिबियाचा संघ भावूक
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यातच नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी दमदार असा विजय मिळवला.
SL vs NAM
1/10
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली असून सलामीचा सामना श्रीलंका आणि नामिबिया संघात पार पडला.
2/10
या सलामीच्या सामन्यातच नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
3/10
विशेष म्हणजे या ऐतिहासिक विजयानंतर नामिबियाचे खेळाडू कमालीचे भावूक झाले होते.
4/10
मैदानातच त्यांचे डोळे पाणावले असून आयसीसीनं पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये हे दिसून येत होतं.
5/10
वर्ल्डकप क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करत इतिहास रचला ज्यानंतर नामिबियाचा कर्णधार गेराड इरॉसमस भावूक झाला होता.
6/10
''हा अविश्वसनीय प्रवास असून मागील वर्षीचा विश्वचषक आमच्यासाठी विशेष अनुभव होता. यंदा दणदणीत विजयाने आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली असून अजूनही बरीच कामं बाकी आहेत. आमच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून आम्हाला सुपर 12 मध्ये स्थान मिळवायचं आहे. असं कर्णधार इरॉस्मस यावेळी म्हणाला.
7/10
या विजयानंतर मैदानात उपस्थित नामिबियाचे चाहतेही कमालीचे आनंदी दिसून आले.
8/10
सामन्याकत प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले.
9/10
ज्यानंतर श्रीलंकेचा संघ मात्र 19 षटकांत 108 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे नामिबायाने 55 धावांनी सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
10/10
नामिबियाकडून जॅन फ्रायलिंकने 28 चेंडूत ठोकलेल्या 44 धावा नामिबियासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
Published at : 16 Oct 2022 06:12 PM (IST)