Rezvani Armoured SUV : आर्मी टँक, बुलेट यांसारख्या फिचर्ससह Rezvani Armoured कार लॉन्च; 'ही' आहे किंमत
कॅलिफोर्नियातील आघाडीची कार निर्माता कंपनी रेझवानी मोटर्सने एक जबरदस्त मिलिटरी ग्रेड SUV लाँच केली आहे. कंपनीने या पॉवरफुल SUV ला Rezvani Vengeance असे नाव दिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही कार बनवण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी याला बुलेटप्रूफ ग्लास, बॉडी आर्मर, रन-फ्लॅट मिलिटरी टायर, स्मोक स्क्रीन, अंडरसाईड एक्सप्लोझिव्ह प्रोटेक्शन आणि नाईट व्हिजन मिळते.
त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 7 बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, हायपोथर्मिया किट आणि गॅस मास्क पॅकेजही या कारमध्ये ठेवण्यात आले आहेत.
ही कार दिसण्यात इतर कारपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याची 22 इंच चाके आणि 35 इंच टायर असलेली जाड रचना आहे. याशिवाय, मागील बाजूस एक खूप मोठा एलईडी लाईट बार देखील दिसत आहे.
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये सुपरचार्ज केलेले 6.2-लिटर V8, नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड 6.2-लिटर V8 आणि 3.0L Duramax डिझेल इंजिन दिले गेले आहे. तसेच, किमान आठ जण या कारमध्ये बसू शकतात. इतकी या कारची क्षमता असते.
किंमतीबद्दल बोलायचे तर, या शक्तिशाली SUV ची सुरुवातीची किंमत $249,000 (2.04 कोटी रू.) आहे, जी $630,000 (5.17 कोटी) पर्यंत जाऊ शकते.